राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. राज्य सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा श्री सेवकांना पैसे देऊन गप्प केल्याचा संजय राऊतांचा आरोप, शिंदे गटाकडून तक्रार दाखल; म्हणाले, “रोज सकाळी…”

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

“देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना ‘सत्तेत आल्यास दोन दिवसांत आरक्षण देतो’, असं म्हणाले होते. त्यामुळे न्यायालयात नेमकं काय होतं, याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. इतर सर्व विषयातील निकाल न्यायालयात मॅनेज केले जातात. मग महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या समाजासाठी असलेल्या आरक्षणाचा निकाल आपल्या मनासारखा का लागत नाही?” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

हेही वाचा – VIDEO : वाढत्या तापमानामुळे राज्यातील ‘या’ शाळांना आजपासून सुट्टी; मंत्री दीपक केसरकरांची माहिती

“मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही कुठं कमी पडला?”

“आमच्या हातात सत्ता द्या, लगेच आरक्षण देतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मग आता त्यांच्या हातात नऊ महिन्यांपासून सत्ता आहे. अशावेळी सीमाप्रश्नापासून ते मराठा आरक्षणापर्यंत कोणताही निकाल मनासारखा लागत नाही. याचं का कारण काय? या विषयावर तुमची दातखिळी का बसली आहे? आमच्या हातातून धनुष्यबाण चिन्हा काढून घेताना तुमच्या हालचाली बरोबर असतात, मग मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही कुठं कमी पडलात? हे तुम्ही लोकांसमोर येऊन सांगायला हवं”, अशी टीकाही त्यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीसांच्या त्या टीकेला प्रत्युत्तर

दरम्यान, राजकारणातील कटुता संपवायची असेल तर सकाळचा अभंग बंद करायला हवा, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी काल संजय राऊतांना लगावला होता. त्यालाही राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. “आमच्या अभंगात फडणवीसांनी सहभागी व्हावं. त्यांनी अभंगाची चेष्टा करू नये. अभंग ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. तुमच्यात हिंमत असेल तर अभंगाला उत्तर द्या”, असे ते म्हणाले.