‘लोकसत्ता’चे सहसंपादक संदीप आचार्य यांना पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्यासाठी यंदाचा ज्येष्ठ पत्रकार नारायण आठवले स्मृती पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.  गोवा येथील ‘लोकविश्वास प्रतिष्ठान’तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून येत्या १६ ऑगस्ट रोजी गोव्यात होणाऱ्या समारंभात आचार्य यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.११ हजार १११ रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 सामाजिक कार्याव्यतिरिक्त सडेतोड लेखनाबद्दल निवड समितीने हा पुरस्कार जाहीर केल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनुप प्रियोळकर यांनी म्हटले आहे.
 आचार्य यांना याआधी उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल राज्य शासनाचा आचार्य अत्रे पुरस्कार, महापौर पुरस्कार, डहाणूकर पुरस्कार, रायकर बोस पुरस्कार, अप्पा पेंडसे पुरस्कार आदी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.