गेली १५ वर्षे रुग्णसेवेचे काम करणाऱ्या ‘राजहंस प्रतिष्ठान’ या संस्थेचा ‘राजहंस पुरस्कार-२०१७’ कुष्ठरोग निवारणासाठी काम करणाऱ्या ‘लोकनायक जयप्रकाश नारायण कुष्ठरोग निवारण’ संस्थेचे संस्थापक डॉ. जगदीश सामंत यांना जाहीर झाला असून पुष्पगुच्छ, शेला, स्मृतिचिन्ह आणि ५० हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ सहसंपादक संदीप आचार्य यांना त्यांच्या आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील पत्रकारितेतील कामगिरीबद्दल गौरविण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शास्त्रीय संगीत गायिका विदुषी श्रुती सडोलीकर काटकर, व्याख्यात्या विदुषी धनश्री लेले, ‘इंडिगो रेमेडिज’चे अध्यक्ष आणि ‘सुमती संगोपन ट्रस्ट’चे संस्थापक सुरेश कारे यांना जाहीर झाला आहे. संगीत प्रचाराचे कार्य करणाऱ्या कमलाकर नेने स्मृती विशेष पुरस्कार शास्त्रीय संगीत गायिका यशस्वी साठे सरपोतदार यांना देण्यात येणार आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल. याप्रसंगी अशोक पत्की यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘सप्त सूर माझे’ हा गाण्यांचा कार्यक्रम सादर होणार आहे, असे ‘राजहंस प्रतिष्ठान’चे अध्यक्ष सुहास कबरे यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sandeep acharya get rajhans award
First published on: 03-02-2017 at 02:13 IST