शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच २३ जानेवारीला विधीमंडळात त्याचं तैलचित्र लावलं जाणार आहे. मात्र, या उद्घाटन कार्यक्रामाच्या निमंत्रणपत्रिकेत उद्धव ठाकरेंचं नाव नसल्याने ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. दरम्यान, यावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्रात सध्या सूड आणि बदला घेण्याचं राजकारण सुरू असल्याचे ते म्हणाले. तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीसांबाबतही सुचक विधान केलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी संदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसच्या आमदारांमध्येही अस्वस्थता, लवकरच…”; भाजपा खासदाराचा दावा

devendra fadnavis reaction on Firing at Salman Khan galaxy apartment in mumbai
सलमान खानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”
Chandrasekhar Bawankule
“बच्चू कडूंचा भाजपशी थेट संबंध नाही, त्यांच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

काय म्हणाले संजय राऊत?

“सरकार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र लावत आहे आणि त्यांचे चिरंजीव जे राज्याचे मुख्यमंत्रीही होते, त्यांना सन्मानाने बोलवत नाही. याचा अर्थ तुम्ही राजकारण सुरू आहे. उद्धव ठाकरे म्हणातात की राज्यात बाप पळवणारी टोळी आली आहे, यात तथ्य आहे. आम्ही जेव्हा सावरकरांचे तैलचित्र लावलं होतं, तेव्हा आम्ही त्यांच्या नातेवाईकांना आमंत्रित केलं होतं. ही या राज्याची परंपरा राहिली आहे. मात्र, राज्य सरकारकडून कोणत्याही परंपरा पाळल्या जात नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच तैलचित्रामागे नेमकं काय राजकारण आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही”, असेही ते म्हणाले.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांना अनेक कार्यक्रमांमध्ये बोलावलं गेलं नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंना आमंत्रण दिलं नाही का? असं विचारलं असता, “फडणवीस असं काही करतील, असं वाटत नाही. ते बदला घेतात की नाही, हे मी सांगू शकत नाही. मात्र, महाराष्ट्रात बदला आणि सूड घेण्याचं राजकारण सुरू आहे”, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

हेही वाचा – राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; परळी न्यायालयात आज हजर राहणार

पंतप्रधान मोदीच्या मुंबई दौऱ्यावरूनही टीकास्र

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई विद्यापीठाची संरक्षक भींत तोडल्याचा आरोप युवासेनेच्यावतीने करण्यात आला आहे. यावरून त्यांनी शिंदे-भाजपा सरकारवर टीकास्र सोडलं आहे. भाजपाने मागच्या वेळी सुद्धा विद्यापीठात घाण आणि गोंधळ करून ठेवला होता. पंतप्रधानांची सुरक्षा सर्वोच्च आहे, याबाबत दुमत नाही. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने काही अडचणी असतील तर त्यांची सभा दुसऱ्या ठिकाणी ठेवता आली असती. युवासेने हा मुद्दा उपस्थित केला आहे, याचा अर्थ त्यांनी या जागेची पाहणी केली आहे. यासंदर्भात आता सरकारने उत्तर द्यावं, अशी प्रतिक्रियाही संजय राऊत यांनी दिली. तसेच पंतप्रधान मोदी ज्या कामांच्या उद्घाटनासाठी येत आहेत. त्यातली बरीचशी कामं महाविकास आघाडीच्या काळात झाली आहे, याचाच अर्थ ते आम्ही केलेल्या कामांवर शिक्कामोर्तब करत आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Video: भाजपा खासदाराच्या मुलाचा मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल; थेट मुख्यमंत्र्यांवर केला हल्लाबोल!

डाव्होस दौऱ्यावरून मुख्यमंत्र्यांना केलं लक्ष्य

यावेळी बोलताना त्यांनी डाव्होस दौऱ्यावरूनही मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. डाव्होस दौऱ्यादरम्यान राज्यात ८८ हजार कोटींची गुंतवणूक आल्याचे सरकारकडून सांगण्यात आलं, यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, ”ज्या दिवशी ८८ हजार कोटींच्या विटा महाराष्ट्रात रचल्या जातील तेव्हाच, यावर बोलता येईल. मात्र, त्यापूर्वी आधी सरकारने राज्याबाहेर गेलेले उद्योग परत आणावे”