scorecardresearch

राजकारणाचा विचार केला तर हमाम मे सब नंगे है – संजय राऊत

नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांचे ड्रग्ज पेडलरसोबत संबंध असल्याचा धक्कादायक आरोप करत अनेक खुलासे केले आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राजकारणाचा विचार केला तर हमाम मे सब नंगे है – संजय राऊत
(संग्रहित छायाचित्र)

नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांचे ड्रग्ज पेडलरसोबत संबंध असल्याचा धक्कादायक आरोप करत अनेक खुलासे केले आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “तपास यंत्रणांचा इतक्या मोठ्या प्रमाणात गैरवापर महाराष्ट्राने पाहिलेला नाही. राजकारणाचा विचार केला तर हमाम मे सब नंगे है, त्यामुळे ज्यांची स्वतःची घरं काचेची असतात, त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगडफेक करू नये,” असं संजय राऊत म्हणाले.

“शरद पवारांवर आरोप करताना भाजपाच्या नेत्यांन लाज वाटली पाहिजे, असंही राऊतांनी म्हटलंय. आमच्याही हातात दगड असू शकतात. मात्र, आम्ही संयम बाळगला आहे. कंबरेखालचे वाद आम्हाला नको आहेत, मात्र समोरच्याला हे करण्याची इच्छा असेल तर ते फार वाईट पातळीवर जाईल. असं राऊत म्हणाले. तसेच शरद पवारांनी आतापर्यंत संस्कार असलेलं राजकारण केलंय,” असंही राऊत यांनी सांगितलं. आम्ही नवाब मलिकांच्या पाठिशी आहोत. तपास यंत्रणांचा गैरवापर करून सरकारमधील मंत्र्यांना त्रास दिला जातोय, असा आरोप राऊतांनी केला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या