वैयक्तिक पातळीवर किं वा सामाजिक स्तरावर आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या आणि इतरांच्याही आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या नऊ प्रेरणादायी ‘दुर्गा’चा ‘लोकसत्ता’तर्फे नवरात्र उत्सवानिमित्ताने सन्मान केला जातो. आपल्या परिसरातील अशा कर्तृत्ववान महिलांची माहिती ‘लोकसत्ता’कडे पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेली सहा वर्षे सुरू असलेल्या ‘लोकसत्ता दुर्गा’ या उपक्रमातून अशा अनेक दुर्गाचे प्रेरणादायी कार्य समाजापुढे आले. शहरांपासून ग्रामीण भागापर्यंतच्या, तसेच विविध क्षेत्रांमध्ये अतिशय कष्टांनी आपले एक वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या महिलांचा त्यात समावेश होता.

पुरस्काराविषयी..

* दुर्गाची माहिती २० सप्टेंबर २०२० पर्यंत ‘लोकसत्ता’कडे पाठवावी.

* माहितीबरोबर त्या कर्तृत्ववान महिलेचे छायाचित्र, पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडी पाठवणे आवश्यक.

* आलेल्या माहितीमधून परीक्षक समिती नऊ दुर्गाची निवड करेल.

* नवरात्रीत दररोज एका दुर्गेची ‘लोकसत्ता’तून ओळख करून दिली जाईल.

* एका सोहळ्यात नामवंतांच्या हस्ते दुर्गाचा सन्मान केला जाईल.

माहिती कुठे पाठवाल?

दुर्गाविषयी माहिती loksattanavdurga @gmail.com या ई-मेल आयडीवर वा टपालाने पुढील पत्त्यावर पाठवावी.

‘लोकसत्ता- महापे कार्यालय, प्लॉट नं. ईएल- १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, महापे, नवी मुंबई- ४००७१०’. ई-मेलमध्ये आणि टपालाने पाठवल्या जाणाऱ्या पाकिटांवर ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२०’साठी असा ठळक उल्लेख करावा.

हे महत्त्वाचे

ही माहिती २० सप्टेंबपर्यंत पाचशे शब्दांत आणि नोंदी स्वरूपात पाठवावी. या महिलांचे कार्य विधायक, समाजावर सकारात्मक, चांगला परिणाम करणारे आणि त्या-त्या क्षेत्रात उच्च स्थानी पोहोचलेले असावे. उद्योग, शिक्षण, संशोधन, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, क्रीडा, मनोरंजन, पर्यावरण संवर्धन, सामाजिक कार्य किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो, त्यात कर्तृत्व दाखवलेल्या तुमच्या परिचयातील ‘दुर्गा’ची माहिती पुरस्कारासाठी पाठवू शकता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Search for talented women for lok satta durga award abn
First published on: 09-09-2020 at 00:23 IST