गुंतवणूकदारांना १३.४४ लाख कोटींचा फटका

मुंबई : गेल्या दोन वर्षांतील सर्वात मोठय़ा घसरणीने ‘सेन्सेक्स’ गुरुवारी पावणेपाच टक्के म्हणजे तब्बल २,७०० अंशांनी कोलमडला. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या परिणामांच्या भीतीने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांकडून झालेल्या तुफान विक्रीने झालेल्या या पडझडीत त्यांची १३.४४ लाख कोटी रुपयांची मत्ताही मातीमोल झाल्याचे पाहावे लागले. 

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Adani Group, gautam adani, investment, Ambuja Cement
अदानी समूहाची अंबुजा सिमेंटमध्ये ८,३३९ कोटींची गुंतवणूक
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?

बुधवारच्या तुलनेत सेन्सेक्समधील घसरणीची मात्रा २,८५० अंशांपर्यंत विस्तारली होती. दिवसाची अखेरही जवळपास त्याच पातळीवर म्हणजे २,७०२.१५ अंशांच्या नुकसानीसह, सेन्सेक्सने ५४,५२९.९१ या पातळीवर केली. बरोबरीने निफ्टी निर्देशांकही ८१५.३० अंशांच्या (४.७८ टक्के) घसरगुंडीसह १६,२४७.९५ वर स्थिरावला.  

रुपया घसरला

मुंबई : गुरुवारी अमेरिकी चलनाच्या तुलनेत रुपया १०२ पैशांनी कोलमडून ७५.६३ पातळीवर बंद झाला. गेल्या काही महिन्यांतील प्रतिकूल जागतिक घडामोडींच्या परिणामी आशियाई चलनांमध्ये रुपया हे सर्वात वाईट कामगिरी करणारे चलन ठरले आहे. 

खनिज तेल १०३ डॉलरवर

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या (ब्रेंट क्रूड) किमती प्रति पिंप १०३ अमेरिकी डॉलरवर गेल्या. एकाच दिवसात पिंपामागे तब्बल ८ डॉलरची म्हणजेच सुमारे साडेआठ टक्क्यांच्या मोठय़ा उसळीने तेलाचे दर पुन्हा सात वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले.

सोने ५२ हजारांपुढे

मुंबई: भांडवली बाजार निर्देशांकांनी जे गमावले, त्यापेक्षा अधिक मौल्यवान धातूतील तेजीने गुरुवारी कमावले. सराफ बाजारात स्टँडर्ड सोन्याचे घाऊक दर तोळय़ामागे ५२,३३० रुपयांवर बंद झाले, तर शुद्ध सोन्याने ५२,५४० रुपयांचा दर गाठला. बुधवारच्या तुलनेत हे दर तोळय़ामागे ९३० रुपयांनी वाढले.