हिरे व्यापाऱ्याकडे काम करत असलेल्या नोकरानेच तिजोरीतील ८५ लाखांचे हिरे लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. वांद्रे कुर्ला संकुल येथील डायमंड मार्केटमध्ये अजित शेठ यांचे हिरे खरेदी विक्रीचे दुकान आहे. प्रकाश चौधरी (२५) या नोकराकडे शेठ यांनी विश्वासाने तिजोरीची चावी दिली होती. मात्र मंगळवारी रात्री त्याने तिजोरी उघडून त्यातील ८५ लाख रुपये किंमतीचे हिरे चोरले.सीसीटीव्ही कॅमेऱ्यात प्रकाश हिरे चोरी करत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Aug 2013 रोजी प्रकाशित
नोकराने ८५ लाखांचे हिरे चोरले
हिरे व्यापाऱ्याकडे काम करत असलेल्या नोकरानेच तिजोरीतील ८५ लाखांचे हिरे लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
First published on: 15-08-2013 at 02:23 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Servant theft diamond worth rupees 85 lakh