जेएनपीटीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी अनिल डिग्गीकर यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्या जागेवर आर. एल. मोपलवार यांची रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. राज्य सरकारने सात ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य सचिव म्हणून व्ही. के. कानडे यांची, तर माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव म्हणून व्ही. के. गौतम यांची नियुक्ती झाली आहे. कोकण विभागीय आयुक्तपदी टी. व्ही. संत्रे यांची, तर सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून आर. आर. चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे.
राज्य खनिकर्म महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी निरुपमा डांगे यांची नियुक्ती झाली आहे. नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुमंत रावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Sep 2015 रोजी प्रकाशित
सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
जेएनपीटीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी अनिल डिग्गीकर यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्या जागेवर आर. एल. मोपलवार यांची रस्ते विकास ..
First published on: 01-09-2015 at 04:19 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven ias officers transferred