२० वर्षांपूर्वी फसवणुकीच्या गुन्ह्य़ात पुणे पोलिसांकडून अटक

शिफू सन-कृतीचा म्होरक्या सुनील कुलकर्णीने बँकेचे कर्ज मिळवून देतो असे आमीष दाखवून पुण्यातील एका व्यक्तीला तीन लाखांचा गंडा घातल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे.

Rohit Sharma Shared Heart Wrenching Story of Daughter's Birth
लेकीच्या जन्मावेळी रोहित शर्मा पोहोचू शकला नाही, ‘हे’ दोन खेळाडू ठरले कारण; ५ वर्षांनी सांगितला मोठा प्रसंग
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस

२० वर्षांपूर्वी भोसरीत राहणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून पुणे पोलिसांनी कुलकर्णीला बेडय़ा ठोकल्या होत्या. योगायोगाने ज्या अधिकाऱ्याने त्या गुन्ह्य़ाचा तपास केला होता तो सध्या गुन्हे शाखेत साहाय्यक आयुक्तपदी नेमणुकीस आहे. दरम्यान, शुक्रवारी कुलकर्णीची पोलीस कोठडीची मुदत वाढवून मिळावी, अशी विनंती गुन्हे शाखेकडून न्यायालयात केली जाईल, असे समजते.

पुण्यातल्या गुन्ह्य़ात कुलकर्णीने बँक अधिकारी असल्याचे भासवले होते. फाडफाड इंग्रजी बोलणे, बॅंक व्यवहारांसह अनेक व्यवसायांमधील घडामोडींची माहिती या जोरावर कुलकर्णीने पुण्यात अनेकांना आकर्षित केले होते. लाखोंचे कर्ज सहज मिळवून देण्याच्या आमीषावर कमिशनपोटी त्याने या व्यक्तीकडून तीन लाख रुपये उकळले होते. कुलकर्णी या व्यक्तीकडून आणखी पैसे उकळण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्याचदरम्यान संबंधित व्यक्तीला आपली फसवणूक होते आहे याची जाणीव झाली आणि त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तेव्हा पुण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक शेखर तोरे यांनी कुलकर्णीला भोसरीच्या एका लॉजमधून अटक केली होती. तेव्हा कुलकर्णीने तो मूळचा कोल्हापूरचा असल्याचे सांगितले होते. सध्या तोरे गुन्हे शाखेचे साहाय्यक आयुक्त आहेत.

डॉक्टरकीच्या पदव्या बोगस

याआधी गुन्हे शाखेच्या तपासात कुलकर्णी मूळचा नागपूरचा असून दिल्लीत स्थायिक असल्याची माहिती स्पष्ट झाली आहे. तसेच त्याच्या डॉक्टरकीच्या सर्व पदव्या बोगस असल्याची माहितीही मिळाली होती. कुलकर्णीविरोधात दिल्लीच्या वसंतविहार पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचाही गुन्हा दाखल आहे.