Premium

मुंबई : महिलेकडून भाच्यावर लैंगिक अत्याचार, पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

आपल्या घरी वास्तव्यासाठी आलेल्या १६ वर्षीय भाच्यावर महिलेने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Sexual assault on nephew by woman
मुंबई : महिलेकडून भाच्यावर लैंगिक अत्याचार, पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : आपल्या घरी वास्तव्यासाठी आलेल्या १६ वर्षीय भाच्यावर महिलेने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – मुंबई : लोकलच्या मालडब्यातून अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या ३११ प्रवाशांवर कारवाई, ४६ हजार रुपये दंड वसूल

हेही वाचा – मुंबई : अंमलीपदार्थांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांत खरेदी केलेल्या तीन कोटींच्या मालमत्तेवर टाच, गुन्हे शाखेची कारवाई

मुलगा मुळचा परराज्यातील रहिवासी असून मुंबईत वास्तव्यास असलेल्या मामाकडे तो आला होता. महिलेने मुलाला मारहाण करून मार्चपासून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. ती मुलाला जेवणही देत नव्हती. मारहाण करून गावी पाठवण्याची धमकी देऊन तिने दोन वेळा त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. अखेर, मुलाने घडलेला प्रकार आईला सांगताच त्यांना धक्का बसला. त्यांनी मुंबई गाठून पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार, पोलिसांनी सदर महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sexual assault on nephew by woman case registered under pocso act mumbai print news ssb

First published on: 30-11-2023 at 22:13 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा