कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची जोरदार मागणी दलित नेत्यांकडून करण्यात येत आहे. दलित जनतेकडून काही वर्षांपासून ही मागणी करण्यात येत आहे. मात्र या मागणीचा अद्याप विचार झाला नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कांदिवलीच्या एलबीएस रोडवरील शताब्दी रुग्णालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आरोग्य समितीच्या विचारार्थ मांडण्यात येणार असल्याची माहिती महापौर सुनील प्रभू यांनी एका पत्राद्वारे दिली आहे. आरोग्य समिती पाठोपाठ स्थायी समितीमध्ये या प्रस्तावाला तातडीने मंजुरी मिळेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु अद्याप आरोग्य समितीमध्ये तो प्रस्ताव सादर झालेला नाही, असे रामदास आठवले यांनी सांगितले. शताब्दी रुग्णालयाला डॉ. आंबेडकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने प्राधान्याने आरोग्य समिती आणि स्थायी समितीमध्ये सादर करावा आणि तो तातडीने मंजूर करण्यासाठी महापौर सुनील प्रभू यांनी योग्य ती पावले उचलावीत, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Nov 2012 रोजी प्रकाशित
‘शताब्दी रुग्णालयाला डॉ. आंबेडकरांचे नाव द्या’
कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची जोरदार मागणी दलित नेत्यांकडून करण्यात येत आहे. दलित जनतेकडून काही वर्षांपासून ही मागणी करण्यात येत आहे.
First published on: 25-11-2012 at 03:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shatabdi hospital demand name dr ambedkar