बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोप पीटर मुखर्जी यांना जामीन देण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाकडून सोमवारी सीबीआयला विचारणा करण्यात आली. आजच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने यासंदर्भात सीबीआयकडून अभिप्राय मागवला. न्यायमुर्ती रेवती मोहिते-ढेरे यांनी याप्रकरणाची सुनावणी ७ जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. यापूर्वी सत्र न्यायालयाने पीटर मुखर्जी यांना दोनदा जामीन नाकारला होता. आरोपपत्रात माझ्यावर कोणत्याही गुन्हेगारी कृत्याचा आरोप नसल्याचा दावा करत मुखर्जी यांनी जामीन देण्याची विनंती केली आहे. पीटर यांना गेल्या नोव्हेंबर महिन्यात सीबीआयने अटक केली होती.
इंद्राणी-पीटरच्या अडचणी वाढणार!