मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्याआधी केलेले सर्व दावे फोल ठरवत पहिल्याच मुसळधार पावसात मुंबापुरीची तुंबापुरी झाली. सालाबादप्रमाणे यंदाही अवघ्या काही तासांमध्ये मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साठल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. विरोधकांनी अगदी विधान परिषदेमध्ये मुंबईच्या पवासाचा मुद्दा उपस्थित करत राज्यातील सत्ताधारी भाजपा आणि त्यांचा मित्रपक्ष तसेच मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ट्विटवरही मुंबई कोणामुळे तुंबली यावरुन भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात ट्विटर युद्ध सुरु आहे. मात्र या सर्व गोंधळामध्ये शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांचा शायराना अंदाज ट्विटरवर पहायला मिळत आहे.

सत्ताधारी शिवसेनेने केलेले मान्सून पूर्व तयारीचे सर्व दावे फोल ठरत असल्याची टिका विरोधक करत आहेत. मात्र संजय राऊत यांनी विरोधकांना उत्तर देण्याऐवजी ट्विटवरुन या पावसासंदर्भात एक शायरी पोस्ट केली आहे. ‘कुछ तो चाहत रही होगी इन बारिश की बूँदों की भी, वर्ना कौन गिरता है इस जमीन पर आसमान तक पहुँचने के बाद!’ या ओळी राऊत यांनी ट्विट केल्या आहेत. सोमवारपासून सतत पडत असणाऱ्या आणि आज सकाळ जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असतानाच दुपारी एक वाजताच्या सुमारास राऊत यांनी ही शायरी पोस्ट केली आहे.

एकीकडे मुंबईकरांचे हाल होत असताना राऊतांनी हे ट्विट केल्याने नेटकरी चांगलेच संतापले असून अनेकांनी त्यांना ट्विटवर दिलेल्या उत्तरामध्ये राऊत यांच्यावर टिका केली आहे.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

दरम्यान सतत पडणाऱ्या पावसामुळे मालाड भागात भिंत खचल्याने १९ मजुरांचा मृत्यू झाला, तर १० पेक्षा जास्त मजूर जखमी झाले. या मृत्यूंना महापालिका जबाबदार असल्याचे विरोधाकांनी केलेले आरोपही राऊत यांनी खोडून काढले आहेत. १९ मजुरांच्या मृत्यूला मुंबई महापालिका नाही तर पाऊस जबाबदार आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मालाडमध्ये जी घटना घडली तो एक अपघात आहे. पाऊसच इतक्या प्रमाणात झाला की हा अपघात घडला. मुंबईत अनेक बेकायदा बांधकामं सुरू आहेत मात्र मुंबई महापालिकेचा त्याच्याशी संबंध नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.