मुंबईतील गिरगाव चौपाटीवर चणे-फुटाणे विकून शिक्षणासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या संतोष साबळे या तरुणाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदतीचं आश्वासन दिलं आहे. प्रामाणिक प्रयत्न कर, तुला लागेल ती मदत केली जाईल असा शब्द उद्धव ठाकरेंनी संतोष साबळेला दिला आहे.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील राजेवाडीचा संतोष साबळे याचं प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न आहे. सध्या तो स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करत आहे. मात्र आर्थिक स्थिती चांगली नसल्याने सकाळी अभ्यास आणि रात्रीच्या वेळी पोट भऱण्यासाठी चौपाटीवर चणे-फुटाणे विकणे संतोषचा रोजचा दिनक्रम झाला आहे. संतोष रात्री दहा ते पहाटे पाच या वेळेत चौपाटीवर चणे फुटाणे विकून दिवसा मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्राचा अभ्यास करतो. अभ्यास करण्यासाठी संतोष कलिना येथे विद्यापीठाच्या ग्रंथालयात दिवस घालवतो.

Electricity Contract Workers, maharashtra, Promised Age Relaxation, Permanent Jobs, Yet to Be Fulfilled, nagpur, electricity workers, marathi news, devendra fadnavis,
कंत्राटी वीज कामगारांना वयात सवलतीचे आश्वासन ठरले ‘जुमला’ !
vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
teacher built a democratic gudhi for Public awareness and to increase voter turnout
शिक्षकाने उभारली चक्क लोकशाही गुढी! मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पती-पत्नीकडून जनजागृती
Ayodhya darshan lured by Yogi Adityanath Claims to make all arrangements for the visitors
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अयोध्या दर्शनाचे आमिष! दर्शनाला येणाऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याचा दावा

संतोषची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपर्क साधण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आपला रात्रीचा नित्यक्रम संपवून विद्यापिठात जाणाऱ्या संतोषला मंत्रालयात येण्यासाठी संदेश देण्यात आला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संतोषची विचारपूस करत तो घेत असलेल्या मेहनत आणि धडपडीचे कौतुक केले. “शिक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न कर, त्यासाठी तुला लागेल ती मदत केली जाईल,” असा शब्द यावेळी त्यांनी दिला. त्यासोबतच संतोषला कोणत्या प्रकारे मदत करता येतील याची माहिती घेऊन, त्याला अभ्यासासाठी तातडीने सर्वतोपरी मदत करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्याय विभागाला दिले.

मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याने भारावलेल्या संतोषने उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. तसंच प्रेरणा घेऊन आणखी जोमाने शिक्षणासाठी प्रयत्न करण्याचा मनोदय व्यक्त केला.