श्रीधर तावडे यांचे निधन

श्रीधर रामचंद्र तावडे यांचे (वय ८५) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने विलेपार्ले येथील निवासस्थानी रविवारी सकाळी निधन झाले.

श्रीधर रामचंद्र तावडे यांचे (वय ८५) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने विलेपार्ले येथील निवासस्थानी रविवारी सकाळी निधन झाले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी विजया, मुलगा विनोद , विवेक, विलास आणि जयश्री कदम तसेच सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. श्रीधर तावडे मूळचे कोकणातले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी म्हाडामध्ये नोकरी केली.तावडे यांच्या पार्थिवावर अंधेरी येथील पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shridhar tayde no more

ताज्या बातम्या