अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. अलिकडेच तिने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली असून त्यात अनेक गोष्टींवर मौन सोडलं आहे. यात मी यापुढे घराचे इएमआय कसे भरु अशी चिंता तिने व्यक्त केली होती. तिची ही मुलाखत पाहिल्यानंतर सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती संतापली आहे. इएमआय भरणं शक्य नाही,मग महागड्या वकिलांची फी कशी काय देतेस असा प्रश्न श्वेताने उपस्थित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मुंबईतील खारमध्ये माझं एक घर आहे. जे सुशांत आणि मी भेटण्यापूर्वीच मी घेतलं होतं. त्या घराचे ७४ लाख मी दिले आहेत. पण अजूनही माझ्यावर ५० लाखांचं कर्ज असून ते एचडीएफसी बॅकेतून घेतलं होतं. परंतु, सध्या या घरासंबंधित सगळी कागदपत्रे ईडीकडे आहेत. माझं पूर्ण आयुष्य उद्धवस्त झालं आहे. अशा परिस्थितीत मी महिन्याला १७ हजारांचा इएमआय कसा काय देऊ”, असं व्यक्तव्य रियाने केलं होतं. तिचं हे वक्तव्य ऐकल्यावर श्वेता प्रचंड चिडल्याचं दिसून आलं. श्वेताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत रियाला जाब विचारला आहे.

आणखी वाचा- ‘ड्रग्सविषयीचे चॅट मीच टाइप केले होते’; रियाची कबुली

आणखी वाचा- ‘सुशांत ड्रग्स घेत असता तर…’ एक्स असिस्टंटने केला खुलासा

“१७ हजारांचा इएमआय कसा देणार याची तुला चिंता आहे? प्लीज मला एक गोष्ट सांग देशातल्या सगळ्यात महागड्या वकिलांना तू फी कशी काय देतेस? या केससाठी मग तू त्यांची निवड कशी काय केली?”, असे प्रश्न श्वेताने रियाला विचारले आहेत.

आणखी वाचा- प्रसारमाध्यमांवर रियाची आगपाखड; कॅमेरा पाहून दिली ‘ही’ रिअ‍ॅक्शन

दरम्यान, श्वेताची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी श्वेताला पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे श्वेताने यापूर्वीदेखील रियावर अनेक आरोप केले आहे. रिया सतत खोट बोलत असल्याचं श्वेताने याआधी म्हटलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shweta singh kirti reaction on rhea chakraborty interview says how are you paying the most expensive lawyer ssj
First published on: 29-08-2020 at 12:12 IST