मुंबई : ‘एमएमआरडीए’च्या भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील रांजनोळी येथील १,२४४ घरांची दुरुस्ती अद्यापही रखडलेलीच आहे. या घरांच्या दुरुस्तीसाठीची निविदा प्रक्रियाच अद्याप अंतिम न झाल्याने दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. परिणामी, गिरणी कामगारांची २,५२१ घरांची सोडतही रखडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एमएमआरडीए’च्या भाडेतत्त्वावरील प्रकल्पाअंतर्गत रांजनोळी, ठाणे येथील मे. टाटा हौसिंग कंपनी लिमिटेड प्रकल्पातील १,२४४, रायचूर, रायगड येथील श्री विनय अगरवाल शिलोत्तर प्रकल्पातील १०१९ आणि कोल्हे येथील ‘मे. सांवो व्हिलेज’ प्रकल्पातील २५८ अशी एकूण २,५२१ घरे म्हाडाला गिरणी कामगारांच्या सोडतीसाठी उपलब्ध झाली आहेत. ही घरे २०२२ पासून उपलब्ध असतानाही सोडत मार्गी लागलेली नाही.

हेही वाचा… रेल्वेच्या वक्तशीरपणात ‘एसी’चा खोडा; गोरेगाव-चर्चगेट जलद लोकल रद्द करण्याचा घाट

एमएमआरडीएने मात्र दुरुस्तीची जबाबदारी झटकली. सरते शेवटी राज्य सरकारच्या निर्देशानुसार एमएमआरडीएने दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारली. मात्र यात बराच वेळ गेला आणि सोडत रखडली. ‘एमएमआरडीए’ने रांजनोळीतील घरांच्या दुरुस्तीसाठी १४ डिसेंबर रोजी निविदा प्रसिद्ध केली. जानेवारी – फेब्रुवारीत निविदा अंतिम होऊन दुरुस्तीस सुरुवात होणे अपेक्षित होते. पण ‘एमएमआरडीए’ने अद्याप निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. आता जूनमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागणार आहे.

हेही वाचा… शिखर बँक गैरव्यवहारप्रकरण : बँकेच्या कामकाजात कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही

‘निविदेचे काम सुरू’

यासंबंधी ‘एमएमआरडीए’कडे विचारणा केली असता निविदेचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. ‘एमएमआरडीए’ गिरणी कामगारांच्या घरांबाबत उदासिन असल्याचा आरोप करीत गिरणी कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तातडीने दुरुस्तीची कामे पूर्ण करून घरांची सोडत काढावी, अशी मागणी गिरणी कामगारांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Slow progress about homes of mill workers mumbai print news asj