समाजसेवा शाखेने मंगळवारी घाटकोपर येथील व्हिनस बार वर छापा टाकून २७ जणांना ताब्यात घेतले आहे. याठिकाणी अवैद्य रीतीने सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळताच समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये १२ बारबाला, १० गिऱ्हाईक, ५ कर्मच्यारी आणि १ मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.