महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ऑक्टोबर महिन्यात घेतलेल्या विविध पदांच्या परिक्षेचा निकाल सोमवार, २६ नोव्हेंबर रोजी तसेच शुक्रवार, ३० नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.महामंडळाने महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) या संस्थेच्या सहकार्याने ऑक्टोबर २०१२ मध्ये ८९४८ चालक, ६२४७ वाहक, १९३६ लिपिक-टंकलेखक आणि २६५८ सहाय्यक अशा १९ ७८९ पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेतली होती. यापैकी चालक, लिपकि-टंकलेखक आणि सहाय्यक या पदांचा निकाल सोमवारी तर वाहक पदाचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार आहे. उमेदवारांना आपला निकाल महामंडळाच्या http://www.msrtc.gov.in  या संकेतस्थळावर किंवा ‘एमकेसीएल’च्या http://msrtc.mkcl.org या संकेतस्थळावर पाहता येईल.