मुंबई : कलादिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीतील कलादिग्दर्शक, निर्माते व तंत्रज्ञांकडून चित्रीकरणाच्या कामांसाठी पैसे उकळणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या गुंडगिरीची गंभीर दखल घेत ही गुंडगिरी कठोरपणे मोडून काढण्याचा आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी बुधवारी पोलिसांना दिला. त्याचबरोबर अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी मनोरंजन क्षेत्रीतील ही मंडळी, कामगार विभाग, पोलीस आदींचा समावेश असलेली समिती स्थापन करून त्यातून प्रश्न सोडवण्यासाठी एक कायमस्वरूपी यंत्रणा स्थापन करण्याची सूचनाही वळसे-पाटील यांनी के ली. साप्ते यांनी आत्महत्या के ल्याच्या प्रकरणाची माहिती देण्यासाठी व त्यानिमित्ताने सिनेसृष्टीत सुरू असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या गुंडगिरीबाबत दाद मागण्यासाठी कलादिग्दर्शक -निर्माते आदींनी बुधवारी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strict action will be taken against goons in film industry says dilip walse patil zws
First published on: 08-07-2021 at 00:03 IST