रसायनशास्त्र या विषयाचा अभ्यास अजिबात जमत नसल्यामुळे आपण नापास होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करून तृतीय वर्ष विज्ञान शाखेत शिकत असलेल्या एका २० वर्षे वयाच्या तरुणाने शुक्रवारी रात्री आत्महत्या केली. गोरेगाव पश्चिम येथील बांगूर नगर परिसरात ही घटना घडली.
बजरंग दलात पदाधिकारी असलेल्या परशुराम दुबे यांचा चिरंजीव अमित हा कांदिवलीतील एका महाविद्यालयात विज्ञान शाखेत शेवटच्या वर्षांत शिकत होता. बांगूर नगर येथील एक मजली घरात शुक्रवारी रात्री घरी कोणीही नाही हे पाहून अमितने पंख्याला लटकून आत्महत्या केली. कामानिमित्त बाहेर गेलेली त्याची आई रात्री ११ च्या सुमारास घरी आली तेव्हा दरवाजा बंद होता. तिने खिडकीतून पाहिले असता मुलगा पंख्याला लटकत असल्याचे आढळून आले. मृतदेहाजवळ चिठ्ठी सापडली असून त्यात लिहिले आहे की, आपला रसायनशास्त्र हा विषय कच्चा असून काहीही केल्या अभ्यास होत नाही. त्यामुळे परीक्षेत निश्चितच नापास होणार. त्यामुळे आपण आत्महत्या करीत आहोत. पोलिसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठविण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student commits suicide at goregaon
First published on: 13-10-2013 at 04:04 IST