उपनगरी गाडीमधून प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणींना लुटणाऱ्या दोन शाळकरी मुलांना भांडुप येथे रेल्वे पोलिसांनी अटक केली. त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
मंगळवारी दुपारी भांडुप रेल्वे स्थानकात एका तरुणीची पर्स चोरताना महिला रेल्वे पोलिसांनी या मुलांना अटक केली. त्यांचा एक साथीदार पळून गेला. या मुलांच्या अंगझडतीत त्यांनी चोरलेले दोन मोबाइल आणि साडेचार हजार रुपये आढळून आले. ही दोन्ही मुले १२ आणि १३ वर्षांची असून भांडुप येथील हिंदी माध्यमाच्या शाळेत सातवीत शिकतात. या बाबत माहिती देताना कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी धुमाळ यांनी सांगितले की, या दोन्ही मुलांच्या घरची परिस्थिती चांगली आहे. पण मौजमजेसाठी ते चोरी करीत असत. शाळेच्या गणवेषातच ते रेल्वे स्थानकात चोऱ्या करीत असत़
संग्रहित लेख, दिनांक 16th Jan 2013 रोजी प्रकाशित
तरुणींना लुटणारे शाळकरी विद्यार्थी अटकेत
उपनगरी गाडीमधून प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणींना लुटणाऱ्या दोन शाळकरी मुलांना भांडुप येथे रेल्वे पोलिसांनी अटक केली. त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
First published on: 16-01-2013 at 04:40 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students get the arrest for robbery against workers