मुंबई : ब्रिटनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांना आता तेथे कामाचा अनुभव घेणेही शक्य होणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दोन वर्षे नोकरी किंवा काम करण्यासाठी आवश्यक व्हिसाही मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही वर्षांपासून भारतातून ब्रिटनमध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यर्थ्यांची संख्या वाढली आहे. यंदा जून महिन्यांपर्यंत आकडेवारीनुसार २२ हजार भारतीय विद्यार्थी ब्रिटनमध्ये शिक्षण घेत आहेत. गेल्यावर्षीपेक्षा ब्रिटनमध्ये शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४२ टक्क्य़ांनी वाढली आहे. विशेषत: विज्ञान, तंत्रज्ञान शाखांतील पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थी ब्रिटनला प्राधान्य देतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तेथे काम करण्याची संधीही या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी मिळालेल्या किंवा मिळू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे नोकरीसाठी आवश्यक असलेला व्हिसा देण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला आहे. या विद्यार्थ्यांना ‘स्किल्ड वर्क व्हिसा देण्यात येईल. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांपासून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय लागू होईल. त्याचबरोबर पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरील निर्बंधही काढून टाकले आहेत.

व्हिसा मिळवण्याची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांत ९६ टक्के अर्जदार विद्यार्थ्यांना व्हिसा मिळाला आहे.

भारतीय विद्यार्थी आणि ब्रिटन दोघांच्याही दृष्टीने हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे. परदेशी शिक्षणासाठी जाऊ  इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही खूप चांगली संधी आहे. या निर्णयामुळे भारतीय विद्यर्थ्यांना जागतिक पातळीवर त्यांची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.

– टॉम बर्टव्हीसल, (ब्रिटिश काऊन्सिल ऑफ इंडियाच्या उत्तर विभागाचे संचालक)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students going in uk for education will get work visa zws
First published on: 12-09-2019 at 04:42 IST