द्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे सांत्वन केले. या वेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रतिमेला फुले वाहून आदरांजली वाहिली. दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्योगमंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले, त्यावेळी सुशीलकुमार शिंदे यांना मुंबईत येता आले नाही. पंतप्रधान मनमोहन सिंग परदेश दौऱ्यावर गेल्यामुळे शिंदे यांना बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित राहता आले नव्हते. शनिवारी मुंबईत येताच श्िंादे यांनी ‘मातोश्री’वर जाऊन ठाकरे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. राणोंनी ‘मातोश्री’ची वेळ मागितली नारायण राणे यांनीही शनिवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्या वेळी ‘स्वाभिमान संघटने’चे अध्यक्ष नीतेश राणे उपस्थित होते. दरम्यान, उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी नारायण राणे यांनी वेळ मागितल्याचे समजते.