आजारपणाला कंटाळून मालाडच्या कुरार भागात एका पोलिसाच्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली. कांता गोसावी (४७) असे त्यांचे नाव आहे. गेली १२ वर्ष त्या ब्रेन टय़ूमरने त्रस्त होत्या.
 कुरार गावातील भीमनगर येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मदनजीत गोसावी पत्नी कांता, मुलगा सचिन आणि सून अश्विनी यांच्यासह रहात होते. कांता यांना ब्रेन टय़ूमर होता. त्यावर उपचार होत नसल्याने त्या त्रस्त होत्या. बुधवारी दुपारी अश्विनी मुलीला आणण्यासाठी शाळेत गेली असल्याने घरात कुणी नव्हते. दुपारी अडीचच्या सुमारास त्या घरात आल्यानंतर त्यांना कांता गळफास लावलेल्या स्थितीत आढळल्या. त्यांनी कुठलीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नव्हती.