मध्य रेल्वेची रडकथा काही संपताना दिसत नाही. ठाणे स्थानकाजवळ झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मध्ये रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे.
ठाणे स्थानकात फलाट क्रमांक ४ वर तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील गाडय़ांची वाहतूक चांगलीच रखडली. परिणामी ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत. तर इतर धीम्या गाडय़ांची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे.