मुंबई : विविध क्षेत्रांत आपल्या कतृत्र्वाचा ठसा उमटवून प्रेरणादायी ठरणाऱ्या युवा प्रज्ञावंतांचा शोध पुन्हा सुरू झाला आहे. उद्यमशीलता, जिद्द आणि प्रज्ञेला गौरविणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांचे पाचवे पर्व खुले झाले आहे.विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, क्रीडा, साहित्य, कला, मनोरंजन, कायदा, धोरणे, राजकारण, प्रशासन, उद्योग-व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत तरुण पिढी आपला ठसा उमटवत असल्याचे आश्वासक चित्र आहे. आपल्या बुद्धिमत्तेचा, कौशल्याचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी हे तरुण-तरुणी धडपडत असतात. प्रसिध्दीची सगळी तंत्रे हाताशी असतानाही प्रसिद्धीपासून दूर राहून आपापल्या क्षेत्रात कार्यमग्न असलेल्या या तरुणतुर्काना दरवर्षी ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा या पुरस्कारांचे पाचवे वर्ष असून, आतापर्यत विविध क्षेत्रांतील ६२ ‘तरूण तेजांकितां’ना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील चाळिशीच्या आतील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या, उद्योजक – संशोधक – कलावंत – समाजसेवक, प्रशासक अशा विविध भूमिकांमधून समाजात बदल घडवू पाहणाऱ्या युवाशक्तीचा गौरव हे या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांचे मुख्य उद्दिष्ट आहे. या पुरस्कारांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, आलेल्या प्रवेशिकांमधून मान्यवरांची स्वतंत्र समिती विविध निकषांच्या आधारे ‘तरूण तेजांकितां’ची निवड करते. पुरस्कारासाठी निवड झालेल्या प्रज्ञावंतांना समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

Raj Thackeray
Heat Wave: राज ठाकरेंचं मुक्या प्राण्यांसाठी भावनिक आवाहन
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
election material making work increase due to parties splits
पक्षफुटींमुळे प्रचार साहित्याला ‘अच्छे दिन’; झेंडे, टोप्या, फेटे निर्मितीस सुरुवात, चिन्हे जास्त असल्याने कामात वाढ
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

प्रवेशिका ऑनलाइन यंदाच्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. नोंदणीसाठी प्रवेशपत्रिका ऑनलाइन भरणे अनिवार्य आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, क्रीडा, साहित्य, कला, प्रशासन, व्यवसाय -नवउद्यमी इत्यादी क्षेत्रांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करणारे तरुण या पुरस्कारासाठी नोंदणी करू शकतात.

https:// taruntejankit.loksatta.com/ या संकेतस्थळावर प्रवेशिका भरायच्या आहेत. या पुरस्काराच्या निवड प्रक्रियेचे तपशीलही येथे उपलब्ध आहेत.प्रायोजक ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारासाठी ‘सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.’ आणि ‘पीएनजी ज्वेलर्स’ यांचे सहप्रायोजकत्व लाभले आहे.