कांदिवलीतील एका दुकानात चोरी करण्यासाठी आलेल्या दोन चोरांना समतानगर पोलिसांनी अटक केली. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाच्या सतर्कमुळे या दोघांचा चोरीचा प्रयत्न फसल्याचे पोलिसांनी सांगितले. अविनाश सुभाष धोत्रे आणि तुकाराम हनुमंता पवार अशी या दोघांची नावे आहेत.कल्पेश अजयकुमार मिश्रा हा कांदिवलीतील पोयसर, काजूपाडा परिसरात त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. याच परिसरात एक खाजगी कंपनी तो सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहे. सध्या त्याची नेमणूक कंपनीच्या ठाकूर व्हिलेज येथील व्हाईसरॉय कोर्ट इमारतीमध्ये होती. तीन दिवसांपूर्वी तो नेहमीप्रमाणे रात्रपाळीत कामावर उपस्थित होते. यावेळी त्याचासोबत सहकारी साहिल अहमद चौधरी होता.

हेही वाचा >>>मुंबई : बनावट क्रमांकाचा वापर करून रिक्षा चालविणारे दोघे अटकेत

Women Manipur violence Update
Manipur Violence : “पीडित महिला पोलिसांच्या वाहनात बसल्या, पण…”; नग्न धिंडप्रकरणी सीबीआयच्या आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे
kirit love jihad case
मुंबईत टॅक्सी चालकाकडून तरुणीची हत्या, किरीट सोमय्यांनी केला ‘लव्ह जिहाद’चा आरोप
Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
CRPF killed 1 terrorist in Pulwama
काश्मीरच्या पुलवामामध्ये मोठी चकमक, CRPF च्या जवानांकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान

रात्री अडीच वाजता या दोघांनाही दोनजण एका दुकानाचे शटर तोडून आतमध्ये चोरीचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी तातडीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यापूर्वीच कल्पेश आणि साहिलने या दोन्ही संशयित चोरांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या दोघांनाही नंतर समतानगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. चौकशीत त्यांची नावे अविनाश धोत्रे आणि तुकाराम पवार असल्याचे उघडकीस आले. ते दोघेही बोरिवलीतील काजूपाड्यातील रहिवाशी आहेत.चोरीच्या उद्देशाने ते तेथे आले होते, मात्र चोरी करण्यापूर्वीच या दोघांना सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्याविरुद्ध घरफोडीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.