मुंबई महापालिकेतील सुरक्षारक्षक सुनील विठ्ठल कांबळे यास एका ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाच्या पत्नीकडून २० हजारांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री नवी मुंबई परिसरात अटक केली.कामोठे परिसरात राहणाऱ्या रेश्मा शेख यांच्या पतीचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय असून सध्या त्यांचे पती आजारी आहेत. त्यामुळे रेश्मा त्यांचा व्यवसाय संभाळतात. वाहनातील मालामध्ये त्रुटी काढून त्यावर कारवाई करू नये, यासाठी सुनील याने पैशांची मागणी केली होती.
सहाय्यक निबंधक व अधिकाऱ्यास अटक
दरम्यान, नवीमुंबई येथील सायली गृहनिर्माण सोसायटीची नोंदणी करण्यासाठी २४ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी सहायक निबंधक सुदाम रोकडे आणि सहायक सहकारी अधिकारी गजेंद्र कुमावत या दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ पकडले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The three arrested in case of venality
First published on: 21-11-2013 at 02:26 IST