नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ उपस्थित राहणार आहेत. यामुळे आता शिवसेनेची भूमिका काय यावर उलट सुलट चर्चा सुरू होती़  त्याला पूर्णविराम देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर शिवसेनेची भूमिका रविवारी स्पष्ट केली़  
‘आता मोदी सरकार आले असून अच्छे दिन येणार आहेत. पाकिस्तानची इडा पिडा कायमची टळून आमच्या काश्मीरात तसेच संपूर्ण देशात शांतता नांदवी. मात्र त्यासाठी नवाज शरीफ तसा शब्द देणार आहेत का, हा खरा प्रश्न आहे. मात्र मोदी यांच्या समर्थ, खंबीर नेतृत्त्वावर आमचा विश्वास असल्याने सुरुवातीलाच याप्रश्नी शिवसेना त्यांना आडवी जाऊ इच्छित नाही. पण इतके करूनही पाकिस्तान सरळ झाले नाही तर मोदींना हातातील अणुबॉम्बचे बटण दाबावेच लागेल,’ असे उद्धव म्हणाल़े