scorecardresearch

Premium

शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री प्रचारात; उद्धव ठाकरे यांची टीका

राज्यातील अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. मुख्यमंत्र्यांना हे माहीत असूनही त्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने काहीही केले नाही.

This is Uddhav Thackeray criticism during the Chief Ministerial campaign when the farmers are in crisis
शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री प्रचारात; उद्धव ठाकरे यांची टीका( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

मुंबई: राज्यातील अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. मुख्यमंत्र्यांना हे माहीत असूनही त्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने काहीही केले नाही. राज्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने नुकसान होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेलंगणात दुसऱ्या पक्षाचा प्रचार करीत आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मुंबईत सुरू असलेल्या नियोजनशून्य विकासामुळे प्रदूषण झाले आहे. स्वत:चे राज्य न सांभाळणारे मुख्यमंत्री तेलंगणातील प्रचारात मग्न आहेत. त्यामुळे सरकारने राज्य वाऱ्यावर सोडले आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम रक्कम दिवाळीपूर्वी जमा न झाल्यास दिवाळी साजरी करणार नाही, असे आश्वासन देणारे कृषिमंत्री धनजंय मुंडे यांनी पाळले नाही. काही शेतकऱ्यांची तर तुरळक रक्कम देऊन थट्टा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यास गरीब शेतकऱ्याचा मुलगा म्हणून गळा काढला जातो. अशा गरीब शेतकऱ्यांचे पंचतारांकित वैभव राज्यातील प्रत्येक छोटय़ा शेतकऱ्याला लाभो, असा टोला  ठाकरे यांनी लगावला. निवडणुका आल्यावर तिजोरी खुली करणारे भाजप नेते राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीवर मदतीचा हात कधी फिरवणार याची महाराष्ट्र वाट पाहात आहे, असे ठाकरे यांनी नमूद केले.

onion export, onion rate,
कांदा निर्यातीला केंद्राची परवानगी, मुख्यमंत्र्यांची माहिती; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
sarwan singh pandher
‘आम्ही पाकिस्तानमधून नाही आलो’, पोलीस दलाच्या कारवाईनंतर शेतकरी नेत्याचे विधान
Uday Samant about Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुन्हेगारांच्या छायाचित्रांबाबत उदय सामंत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांसोबत कोणी छायाचित्र काढल्यास…”
karnataka Chief Minister Siddaramaiah
कर्नाटक अन् केरळवरील अन्यायाच्या आरोपातून काँग्रेसचे ‘दिल्ली चलो’ आंदोलन, भाजपच्या खासदारांनाही सहभागी होण्याची विनंती

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: This is uddhav thackeray criticism during the chief ministerial campaign when the farmers are in crisis amy

First published on: 29-11-2023 at 02:27 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×