नालेसफाईच्या कामात गेल्या दहा ते पंधरा वर्षांत एक कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत युतीच्या नेत्यांसह महापलिका अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकण्यात यावे, अशी मागणी शुक्रवारी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. तसेच संजय देशमुख समितीने सादर केलेला अहवाल महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी जाहीर करावा अशी मागणीही त्यांनी केली. नालेसफाईच्या कामात गेल्या १० ते १५ वर्षांपासून मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप नेते, महापलिका अधिकारी आणि कंत्राटदारांची हातमिळवणी असल्याचा आरोप निरुपम यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thousand crore rupees corruption in drainage cleaning
First published on: 05-12-2015 at 00:09 IST