मुंबईवर तालिबानशी संबंधित व्यक्ती हल्ला करणार असल्याचा ई-मेल राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) प्राप्त झाला असून या हल्ल्याची माहिती मुंबई पोलीस व दहशतवाद विरोधी पथकाला देण्यात आली आहे. या ई – मेलमध्ये अफगाणीस्थानचे नेते सिराजुद्दीन हक्कानीच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. अमेरिकन यंत्रणा सीआयएकडून संदेश आल्याचे भासवण्यात आले आहे. त्यामुळे हा खोडसाळपणा असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मात्र आता हा ई-मेल पाकिस्तानमधून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा >>>मुंबई: अनामत रक्कमेसह सर्वात आधी येणाऱयास थेट घर

Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
National Consumer Commission hearings,
राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्वसुनावण्या १५ एप्रिलपासून ऑनलाईन!
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

याप्रकरणी मुंबई पोलिसांना कळवण्यात आले असून मुंबई पोलीस याबाबत तपासणी करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एनआयएने गुरुवारी मुंबई पोलिसांना ई-मेल पाठवून याबाबतची माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. ई-मेलमध्ये सीआयएचा अधिकारी असल्याचे भासवण्यात आले आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरुन २६/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला होणार असल्याचा संदेश आला होता. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अनोळखी क्रमांकावरून संदेश प्राप्त झाला होता. सोमालिया देशातील मोबाइल क्रमांकावरून हा संदेश पाठवण्यात आला होता. त्यात त्यांच्या देशात घडलेल्या दहशतवादी घटनांच्या अनुषंगाने खबरदारी बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. सांताक्रुझ येथील एका व्यक्तीला घातपाताच्या धमकीचा व्हिडिओ कॉल आला होता. अशा घटनांमुळे सुरक्षा यंत्रणांवर ताण येत आहे.