दर मंगळवारी आणि संकष्टी चतुर्थीला सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी गणेशजयंतीच्या मुहूर्तावर बेस्ट उपक्रमातर्फे दादर रेल्वे स्थानक ते सिद्धीविनायक मंदिर अशी खास ‘दादर फेरी-३’ ही वर्तुळाकार सेवा सुरू करण्यात आली.
‘दादर फेरी-३’ ही बस दादर रेल्वे स्थानक (प.) (कबुतरखाना) येथून सोडण्यात येणार असून शारदाश्रम, श्री सिद्धिविनायक मंदिर, प्रभादेवी, प्रभादेवी मंदिर, रवींद्र नाटय़ मंदिर, श्री सिद्धिविनायक मंदिर (शंकर घाणेकर मार्ग), श्रारदाश्रम, दादर रेल्वे स्थानक (प.) (कबुतरखाना) अशी धावेल. पहिली बस सकाळी ६.३० वाजता, तर शेवटची बस रात्री ९ वाजता सोडण्यात येईल. मात्र ही बस केवळ दर मंगळवारी आणि संकष्टी चतुर्थीच्याच दिवशी सुरू राहील. महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते रविवारी ‘दादर फेरी-३’चे उद्घाटन करण्यात आले.