सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा त्रिदशकपूर्ती सोहळा मंगळवार, २२ जानेवारी रोजी संस्थेच्या भाईंदर येथील प्रशिक्षण संकुलात आयोजित करण्यात आला आहे.
 या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रबोधिनीचे अध्यक्ष गोपीनाथ मुंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
त्रिदशपूर्ती सोहळ्यानिमित्त संस्थेच्या वतीने विशेष प्रशिक्षण निधी उभारण्यात येणार आहे. या निधीचा उपयोग अनुसूचित जाती, जमाती, आदिवासी आणि अन्य मागासवर्गीस समाजातील तरुणांना नेतृत्व प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी केला जाणार आहे.
संस्थेमध्ये विविध प्रकारच्या संशोधनासाठी काम केलेल्या संशोधकांचे आणि त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांचे ‘प्रशिक्षक-संशोधक’ संमेलन आयोजित करण्यात आले आहे.  
तसेच संस्थेच्या कार्याचा आढावा घेणारी ‘योगदान’ ही स्मृतिपत्रिका कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रकाशित केली जाणार आहे. याशिवाय अन्य विविध कार्यक्रमांचे आयोजन या वेळी करण्यात आले आहे.
अधिकाधिक नागरिकांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- २४१८५५०२.