एका बडय़ा उद्योगसमूहाचा वरिष्ठ अधिकारी अनंत पाठक, त्याचा अंगरक्षक दिलीप पालेकर आणि शिपाई धर्मू राठोड या तिघांना अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने अटक केली. त्यांना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्याजवळ ४.५ ग्रॅम कोकेन सापडल्याची माहिती अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या रोहित कथियार यांनी दिली.