scorecardresearch

मालवणीत चाकूने भोसकून एकाच घरातील तिघांची हत्या

मालवणीमधील न्यू कलेक्टर कॉलनी परिसरात घडली घटना

मालवणीत चाकूने भोसकून एकाच घरातील तिघांची हत्या
पुण्यातील संगणक अभियंता अंतरा दास मृत्यू प्रकरणी तिच्या मित्रास अटक करण्यात आली आहे

मालवणीमध्ये अज्ञातांने चाकूने भोसकून बुधवारी रात्री एकाच घरातील तिघांची हत्या केली. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यावर परिसरात खळबळ उडाली.
मालवणीमधील न्यू कलेक्टर कॉलनी परिसरातील प्लॉट क्रमांक २३मध्ये एका खोलीमध्ये हा प्रकार घडला. यामध्ये बबली शॉ (वय ४७), आर्यन शेख (वय १३) आणि सानिया शेख (वय ८) यांचा मृत्यू झाला. आर्यन आणि सानिया ही बबली शॉ यांची नांतवडे असल्याची माहिती मिळते आहे. बुधवारी रात्री उशीरा हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मुंबई पोलीस पुढील तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-06-2016 at 12:09 IST

संबंधित बातम्या