ज्येष्ठ नागरिक असल्याचे दाखवून रेल्वेचा प्रवास सवलतीच्या दरात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कविता सुरेंद्र जाधव (३५), मीना रेवण गायकवाड (५०) आणि कृष्णाबाई सिद्धू गायकवाड (५५) या तिघींना कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली.
या तीन महिलांनी गुरुवारी सोलापूरला जाण्यासाठी कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील तिकीट खिडकीवर ज्येष्ठ नागरिकाचे ओळखपत्र सादर करीत सवलतीच्या दरातील तिकिटाची मागणी केली. तिकीट क्लार्क एफ. एफ. सिक्वेरा व ऐहती शाम फैजउल्ला खान यांना ओळखपत्राबाबत शंका आली आणि त्यांनी महिलांना कार्यालयात बोलावून घेऊन चौकशी केली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. आपल्याला सोलापूरमधील एका महिलेने ४०० रुपयांत हे ओळखपत्र दिल्याची कबुली या महिलांनी दिली. ही ओळखपत्रे उत्तर प्रदेशच्या तहसिलदारांच्या राजमुद्रित शिक्क्य़ाद्वारे प्रमाणित करण्यात आली आहेत. पोलिसांनी सोलापूरमधील अज्ञात महिलेविरोधात गुन्हा नोंदविला असून तपासासाठी पोलीस पथक सोलापूरला रवाना झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three women arrested who cheated railway
First published on: 09-06-2013 at 04:33 IST