धावत्या लोकलवर भिरकावलेल्या लोखंडी वस्तूमुळे बुधवारी एक प्रवासी जखमी झाला. विनय कटारे असे या प्रवाशाचे नाव असून ते मुंबईहून बदलापूरच्या दिशेने येत असताना हा प्रकार घडला. तीन दिवसांपूर्वी असाच काहीसा प्रकार बदलापूर स्थानक परिसरात घडला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन दिवसांपूर्वी बदलापूर स्थानकात येणाऱ्या बदलापूर लोकलवर एक वस्तू फेकल्याने तरुणाच्या हाताला दुखापत झाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच मंगळवारी रात्री पुन्हा अशाच प्रकारे धावत्या लोकलवर लोखंडी वस्तू भिरकावल्याने विनय कटारे या प्रवाशाच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. कळवा येथे एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या विनय यांनी सायंकाळी सातच्या सुमारास डोंबिवली स्थानकात लोकल बदलून बदलापूर लोकल पकडली होती. लोकल बदलापूरला येत असताना पावणे आठच्या सुमारास बेलवली येथील नाल्याशेजारील भागातून आलेली एक लोखंडी वस्तू दारात उभ्या असलेल्या विनय यांच्या हाताला लागून गेली. या वस्तूमुळे विनय यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना बदलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या हाताला १५ टाके पडले आहेत. अशा घटना वाढत असल्याने रेल्वे पोलिसांच्या गस्ती पथकाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traveler was injured due to items thrown at a running local abn
First published on: 07-11-2019 at 01:00 IST