scorecardresearch

२०० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळय़ाप्रकरणी दोघांना अटक

 सरकारचा महसूल बुडविणाऱ्यांविरोधात वस्तू व सेवाकर विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

easy to go to the moon but difficult to understand the GST policy of the government says gujrat high court judge

मुंबई:  खोटी बिले देऊन सरकारची कोटय़वधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य वस्तू व सेवाकर विभागाने (जीएसटी)  हिरालाल जैन व  प्रमोद कातरनवरे या दोघांना अटक केली आहे.

 सरकारचा महसूल बुडविणाऱ्यांविरोधात वस्तू व सेवाकर विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंर्तगत ‘मे. टेस्को इम्पेक्स’ आणि ‘मे. पारसमणी ट्रेडर्स’ यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. टेस्को इम्पेक्सचे मालक प्रमोद कातरनवरे आणि पारसमणी ट्रेडर्स या कंपनीचे मालक गणेश काकड  हे कोणताही व्यवसाय करीत नाहीत. दोन्ही प्रकरणांमध्ये वस्तूंच्या पुरवठय़ाशिवाय १९७ कोटी रुपयांची बनावट बिले देऊन आणि २९ कोटी रुपयांचा वस्तू व सेवाकर त्यांच्या प्राप्तकर्त्यांना स्थानांतरित करून २९ कोटी रुपयांची बनावट वजावट मिळवून दिली आहे. कोणत्याही वस्तूंचा पुरवठा न करता  बिले तयार करून  सरकारचे नुकसान केल्याचे चौकशीत समोर आले आहे. मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी या दोघांनाही २८ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two arrested in rs 200 crore gst scam akp