ठाणे शहरात तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याच्या दोन घटना घडल्या आहे. महागिरी परिसरात एक १३ वर्षीय मुलगी राहते. ती पंधरा दिवसांपुर्वी मुंब्रा भागात राहणाऱ्या आईच्या घरी गेली होती. त्यावेळी इरफान शेख नावाच्या व्यक्तीने विनयभंग केला. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वागळे इस्टेट भागात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीला नोकरी देण्याचे अमिष दाखवून सिराज कचरुभाई सैय्यद (२५) याने मंगळवारी वाशी येथील गार्डनमध्ये नेले. त्या ठिकाणी त्याने तिचा विनयभंग केला, तसेच भेटण्यास नकार दिल्यास फेसबुक व अश्लील साईटवर फोटो अपलोड करण्याची धमकी दिली. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. कोर्टाने त्याची जामिनावर सुटका केली आहे.