ठाण्यातील पाचपाखाडी भागातील नामदेव वाडीमधील अश्व इमारतीच्या आवारात उभ्या करण्यात आलेली सात दुचाकी वाहने अज्ञात व्यक्तीने जाळल्याचा प्रकार शनिवारी घडला.  वाहने जाळण्याची गेल्या वर्षभरातील ठाण्यातील ही पाचवी घटना आहे.  अश्व अपेक्स इमारतीच्या वाहनतळावर श्रीमती भागवत व दीक्षित कुटुंबीयांसह अन्य तीन कुटुंबीयांच्या एकूण सात दुचाकी उभ्या होत्या. शनिवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने ही वाहने जाळल्याची घटना रविवारी उघडकीस आली.  याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. यापूर्वी वागळे इस्टेट, रघुनाथनगर, कोपरी, किसनगर भागात वाहने जाळण्याचे प्रकारा घडले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.