मुंबई: प्रत्येक वेळी पंडित नेहरूंनी काय केले, असा प्रश्न विचारला जातो. पण ते जाऊन आता साठ वर्षे झाली. नेहरूंनी १६ वर्ष पंतप्रधान पद भूषविले. त्यापेक्षा भाजपचा सत्ता काळ अधिक आहे. गेली दहा वर्षे नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. त्यामुळे नेहरूंपेक्षा भाजपने जास्त काळ सत्ता भोगली आहे. मी नेहरूंचा प्रशंसक नाही, पण प्रत्येक वेळी नेहरूंनी काय केले विचारण्यापेक्षा मोदींनी काय केले, हे सांगण्याची आज गरज आहे, अशी  टीका शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

हेही वाचा >>> गोळय़ा मॉरिसने झाडल्या की अन्य कुणी? उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Sharad Pawar, campaigner, Udayanraje,
शरद पवारच माझे मुख्य प्रचारक – उदयनराजे
Bharat Ratna, Yashwantrao Chavan,
सातारा : यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, उदयनराजे करणार मोदींकडे शिफारस
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन

शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली. सद्यस्थितीबाबत कोणी विचारले की त्याला देशद्रोही ठरविले जाते आणि  पाकिस्तानमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो. जे सरकार व राज्यकर्ते बेरोजगारांना नोकऱ्या देऊ शकत नाही, महागाई रोखू शकत नाही, गुडांचा बंदोबस्त करू शकत नाही, ते कोणतेही सरकार नालायक आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. अयोध्येत प्रभू रामांची पूजा मीच बांधणार, नवीन संसद भवनाचे उद्घाटन मीच करणार, रस्ते, पूल, यांचे पण लोकार्पण मीच करणार, ही एकाधिकारशाही असून ती घराणेशाहीपेक्षा घातक आहे. त्यापेक्षा माझी घराणेशाहीची परंपरा चांगली आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. भारतरत्न पुरस्कार देण्यात काही रूढी, परंपरा आहेत. सध्या मोदींच्या मनात येईल, तेव्हा भारतरत्न दिले जात आहेत अशी टीका ठाकरे यांनी केली.