प्रकल्पाच्या कामाची आणि खर्चाची सर्व माहिती आता खुली

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
dharavi, dharavi redevelopment project, 100 teams
धारावी पुनर्विकास प्रकल्प : महिन्याभरात सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण; सर्वेक्षणासाठी १०० पथके तैनात करणार
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित

मुंबई : एखाद्या गृहप्रकल्पासाठीची रक्कम किंवा निधी त्याच प्रकल्पावर खर्च न करता इतर प्रकल्पासाठी खर्च करायचा आणि मूळ प्रकल्प अर्धवट सोडायचा किंवा रखडवायचा अशा प्रकारांना आता आळा बसणार आहे. एखाद्या गृहप्रकल्पाअंतर्गत विकासकाने किती रक्कम जमा केली आणि ती रक्कम प्रत्यक्षात त्या प्रकल्पावर खर्च केली का याची इत्यंभूत माहिती आता ग्राहकांना मिळणार आहे. सर्व माहिती आता सार्वजनिक करण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे.  त्यामुळे आता एखादा विकासक गैरप्रकार करत असल्याचे आढळल्यास या माहितीचा आधार घेत ग्राहकांना महारेराकडे तक्रार करता येणार आहे. 

बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता यावी आणि ग्राहकांची फसवणूक रोखली जावी यासाठी महारेराकडून रेरा कायद्यातील सर्व तरतुदींची कडक अंमलबजावणी केली जात आहे. तसेच अनेक नव्या तरतुदीही केल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आता गृहप्रकल्पातील कामाची आणि त्यावर विकासकांकडून करण्यात आलेल्या खर्चाची माहिती सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महारेराचे सचिव वसंत प्रभू यांनी दिली. पारदर्शकतेला प्राधान्य देत महारेराने विकासकाकडून अनेक प्रकारची माहिती आणि कागदपत्रे जमा करून घेते. प्रकल्पाचा नकाशा, आराखडा आणि अनेक प्रकारच्या कागदपत्रांचा यात समावेश असतो. विकासकाने प्रकल्पाचे किती काम पूर्ण केले आहे, त्यावर किती खर्च केला आहे, जितका खर्च दाखवला आहे तितक्या खर्चाचे काम झाले आहे का, अशा अनेक प्रकारची माहिती सादर करणे विकासकांना बंधनकारक आहे.