वैभव राऊतसह अटकेत असलेले इतरजण सनातनचे साधक नाहीत असा दावा सनातन संस्थेकडून करण्यात आला आहे. सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. आमच्याविरोधात ज्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्यासाठी कायदेशीर मार्गाचा आधार घेणार आहोत. बदनामी केल्यास कायदेशीर कारवाई करु असा इशारा यावेळी सनातनकडून देण्यात आला आहे. वैभव राऊत याच्या नालासोपाऱ्यातील घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली होती. यानंतर अनेकांना अटक करण्यात आली असून त्यांचा संबंध डॉ नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येशी संबंध असल्याचं म्हटलं जात आहे. याच पार्श्वभुमीवर सनातनकडून पत्रकार परिषद घेण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तपासात थेटपणे सनातनचं नाव अद्याप आलेलं नाही. सनातलना टार्गेट केलं जात आहे असा आरोप सनातनकडून करण्यात आला असून खोट्या गोष्टी पसरवल्या जात असतील तर थांबवण्यात याव्यात असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. हा आमच्यावरील अन्याय आहे. सनातनमुळे कधीच जातीय तेढ निर्माण झालेलं नाही. आम्ही देशाच्या सुरक्षेत अडथळा आणलेला नाही असंही ते म्हणाले आहेत.

कोणत्याही कागदपत्रात आमचं नाव नसतानाही बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. आरोपात तथ्यच नाही त्यामुळे बंदीचा प्रश्न येत नाही असं चेतन राजहंस यांनी सांगितलं आहे. यासोबतच मराठा आंदोलनात घातपात करण्याचा आरोप साफ खोटा असून आरोप करणाऱ्यांची चौकशी करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaibhav raut and others have no connection claimes sanatan
First published on: 27-08-2018 at 14:25 IST