जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत असल्याने निर्बंध आणखी कठोर करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी घेतला. त्यानुसार सर्व किराणा, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुग्धालय आदी खाद्यदुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच खुली ठेवता येतील. आज, बुधवारी सकाळपासून त्याची अंमलबजावणी होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य सरकारने गेल्या आठवड्यापासून निर्बंध लागू करताना संपूर्ण राज्यात १ मेपर्यंत संचारबंदी लागू के ली. मात्र अत्यावश्यक सेवा तसेच सार्वजनिक वाहतूक सुरू ठेवण्यात आली. किराणा मालाची तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली लोक  मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे जीवनावश्यक सेवेतील काही सवलतींवर निर्बंध आणण्याचा प्रस्ताव सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मांडण्यात आला होता. अखेर याबाबत निर्णय घेतल्यानंतर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तसे आदेश मंगळवारी जाहीर केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vegetable and grocery stores till 11 am abn
First published on: 21-04-2021 at 01:01 IST