वाहन नूतनीकरण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात खेटे मारण्याच्या कटकटीतून नागरिकांची काही दिवसांत कायमची सुटका होणार आहे. कारण येत्या मार्चअखेर परवान्याचे नूतनीकरण ऑनलाइनद्वारे केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या एका क्लिकवर परवान्याचे नूतनीकरण करता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी परिवहन विभागाने वाहन चालविण्याचा शिकाऊ आणि पक्का परवाना काढण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली. यात ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होत आहे. याच धर्तीवर नागरिकांना घरबसल्या वाहन परवान्याचे नूतनीकरण करता यावे, यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने मार्च महिन्याच्या अखेरीस ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे.
वाहन परवान्याचे नूतनीकरण ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या मार्चअखेर किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात वाहन परवान्याचे नूतनीकरण करण्याची सुविधा उपलब्ध होईल, असे परिवहन अपर आयुक्त एस. बी. सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vehicle license renewal online
First published on: 10-03-2016 at 02:52 IST