Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना

अधिकाधिक बसगाड्या चालवण्यासाठी एसटी महामंडळाचा नवीन निर्णय

मुंबई: विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच असून यात चालक, वाहक कामावर रुजू होणाऱ्यांची संख्या कमीच आहे. परिणामी एसटीही मोठ्या प्रमाणात धावू शकलेल्या नाहीत. त्यामुळे एसटी महामंडळाने संपकाळात वाहन परीक्षक, सहाय्यक वाहतुक निरीक्षक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांवर चालकाची जबाबदारी देण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. तर वाहतुक नियंत्रकांवर वाहकाची जबाबदारी देण्यात येणार आहे.

त्यासंदर्भात गुरुवारी परिपत्रकच काढण्यात आले. चालक पदातून वाहन परीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षकाची पदोन्नती देण्यात आलेली आहे, अशा कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे उजळणी प्रशिक्षण देऊन त्याचा वापर प्रवासी वाहनावर चालक म्हणून करण्याच्या सूचना राज्यातील सर्व एसटी विभाग नियंत्रक, कार्यशाळा व्यवस्थापक, मध्यवर्ती कार्यशाळांना देण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडे वाहन चालक लायसन्स (अनुज्ञप्ती) बिल्ला असल्याची खात्री करण्यासही सांगितले आहे. तसेच ज्या यांत्रिकी कर्मचाऱ्यांकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना आहे, त्यांच्याकडूनही विभागीय पातळीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयात तात्काळ ऑनलाईन अर्ज करुन व प्रवासी वाहन चालक अनुज्ञप्ती बिल्ला काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. एसटीत वाहकांना वाहतुक नियंत्रक म्हणून पदोन्नती देण्यात येते. अशा वाहतुक नियंत्रकांवरही संपकालावधीत वाहक म्हणून वापर करण्यात यावा,असेही परिपत्रकात म्हंटले आहे. सध्या करोनाकाळात प्रवासी संख्या कमी आहे. त्यामुळे गरजेनुसार त्यांचा वापर केला जाणार आहे. राज्यातील प्रत्येक आगारात दोन वाहन परीक्षक, यांत्रिकी कर्मचारी असतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर ताण पडणार नसल्याचा दावाही महामंडळाने केला आहे.

यांत्रिकी अथवा वाहतूक कर्मचारी यांचा वापर संपकाळात चालक म्हणून आणि वाहतुक नियंत्रक यांचा वापर संपकाळात वाहक म्हणून केल्यानंतर अशा सर्वच कर्मचाऱ्यांना प्रति दिन ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.

संपकालावधीत वाहन परीक्षक, सहाय्यक वाहतुक निरीक्षक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांवर चालकाची, तर वाहतुक नियंत्रकांवर वाहकाची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यासाठी परिपत्रकही काढून संबंधित विभागाला आदेश दिले आहेत.

– शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ