‘ट्रॅजेडी किंग’ अशी बिरुदावली मिरवणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं ७ जुलै रोजी निधन झालं. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक सोनेरी पान गळालं. मोजकेच; पण अजरामर सिनेमातून केलेल्या त्यांच्या अभिनयाचं गारूड चित्रपट रसिकांवर कायमचं कोरलं गेलं. अशा महान कलावंताविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी! दिलीप कुमार यांच्या आठवणी सांगताना नाना पाटेकर यांचाही कंठ दाटून आला… ट्रॅजेडी किंगबद्दल काय म्हणालेत नाना पाटेकर…; ऐका त्यांच्याच आवाजात…

Kiran Mane on Ujjwal Nikam
“दोन पक्षांवर दरोडे पडले तेव्हा हा भामटा…”, किरण मानेंची उज्ज्वल निकम यांच्यावर टीकात्मक पोस्ट
Amar Singh Chamkila Son jaiman
“त्यांच्या पहिल्या पत्नीपासून…”, सावत्र आईच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे अमरसिंग चमकीला यांचा मुलगा, म्हणाला…
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!

पाच दशकांची कारकीर्द…

पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी ‘मुगल-ए-आजम’, ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘राम और श्याम’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘मुगल-ए-आजम’ मधील सलीमप्रमाणेच ‘देवदास’ चित्रपटातील त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतो. देवदास ही बंगाली लेखक शरतचंद्र यांची कादंबरी. बालमैत्रीण पारोवर प्रेम असूनही तिच्याशी लग्न न करता आलेला आणि त्यानंतर दारूच्या नशेत आकंठ बुडालेला, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पारोचा ध्यास घेतलेला ‘देवदास’ दिलीप कुमार यांनी ज्या तन्मयतेने रंगवला. १९९८ मध्ये आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.